नाशिक, 1st March: आयाम नाशिक ट्रस्ट, नाशिक स्थित नोंदणीकृत संस्था असून, खेळ व सांस्कृतिक विश्व समृद्ध होण्यासाठी सन 2017-18 पासून विविध कार्यक्रम घेत आहे.
यंदाच्या वर्षी , आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी मुक्त संवाद, अवलिया आयर्न मॅन पोलिस कमिशनर डॉ. रविंद्रकुमार सिंगल व त्यांची कन्या रविजा सिंगल यांच्याशी नाशिककरांचा संवाद आयामने घडवून आणलाय. नेताजी’ हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील कार्यक्रमातून डॉ. आनंद नाडकर्णी यांनी नाशिककरांशी संवाद साधला. मैलाचा दगड ठरावेत असे विविध कार्यक्रम घेऊन आयाम नाशिकच्या खेळ व सांस्कृतिक क्षेत्र समृद्ध करीत वाटचाल करीत आहे.
दुर्ग दुर्गा हा आयाम नाशिकचाच एक भाग असून महिलांनाही दुर्ग भ्रमणाचा अनुभव घेता यावा, यासाठी जून – 18 पासून आयाम नाशिक तर्फे सुरू करण्यात आला आहे, आतापर्यंत 750 महिला यात सहभागी असून 9 वेगवेगळ्या किल्ल्यावरचे ट्रेक या ग्रुपने यशस्वीरीत्या पूर्ण केलेत. या निमित्ताने गृहिणी बायकाही बाहेर पडल्या आणि अधिक धाडसी खेळांची मागणी करू लागल्या. घराच्या बाहेर पडून अवघड ट्रेक पूर्ण केल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला.
आयामच्याच वाटचालीचे पुढचे पाऊल म्हणून महिलांसाठी कार रॅलीचे नियोजन करण्यात येत आहे. आयाम नाशिक ट्रस्ट,तर्फे विमेन्स कार रॅलीचे आयोजन करण्यात येत असून दिनांक 7 एप्रिल 2019 रोजी ही रॅली होत आहे.
“DRIVE TO HAPPINESS” ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन, खास फक्त महिलांसाठी ही टीएसडी रॅली होत आहे. कोणत्याही गोष्टीला फक्त वेग असून चालत नाही तर आनंदासाठी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक गोष्टींची योग्य सांगड घालणे म्हत्त्वाचे. वेग आणि वेळेची योग्य सांगड घालून रस्त्याचे अंतर टीएसडी रॅलीत पूर्ण करावे लागते, तसेच सर्वाना सोबत घेऊन, वेळ व वेगाचे भान सांभाळून, आयुष्याचे ध्येयही पूर्ण करता येते, हाच संदेश द्विगुणतीत करण्यासाठी वूमन कार रॅली फॉर ड्राइव्ह टू हॅप्पीनेस.
टीएसडी रॅलीमध्ये वेळ, वेग आणि अंतराचे गणित सांभाळणे महत्त्वाचे असते. कोटुंबिक पातळीवर महिला हे गणित अतिशय कौशल्याने यशस्वी करतात, रॅली मध्ये त्यांच्या याच कोशल्याचा कस लागून त्या नक्कीच या मोटर स्पोर्ट्स मध्येही यशस्वी होतील. महिलांसाठी बरेच कमी प्रमाणात मोटर स्पोर्ट्स आयोजिले जातात, त्यामुळे त्यांना अश्या धाडसी खेळांचे अनुभव, इच्छा असूनही घेता येत नाही, आणि म्हणून ह्या रॅलीचे खास प्रयोजन आहे. अधिकाधिक महिलांनी भाग घेऊन ही रॅली यशस्वी होईल, आणि महिलांच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देऊन त्यांच्यासाठी हे नवं अवकाश खुलं होईल, असा आयोजकांना विश्वास आहे.
या टीएसडी रॅलीत दोन प्रकार असून कार किंवा कोणतीही दुचाकी चालक स्त्रिया या रॅलीत सहभागी होऊ शकतात.
रॅलीत सहभागी होताना एक ड्रायव्हर व दुसरा नेवहीगेटर असे जोडीचे रजिस्स्ट्रेशन होईल. दिनांक 8 मार्च महिला दिनापासून रॅलीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल. या साठीचा वेबऍडरेस लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या विमेन्स कार रॅलीचे विशेष म्हणजे विसा, (Western India Sports Association) या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचा यात सहभाग असून फ्रावशी अकॅडमी पुरस्कृत आहे.
तसेच विमेन्स कार रॅली असल्याने, व जोडीने रजिस्ट्रेशन करावयाचे असल्याने सासू-सून, नणंद-भावजय, जावा-जावा, आई-मुलगी, बहिणी-बहिणी, आजी- नात अशा जोड्यांचीही बक्षिसासाठी विशेष कॅटेगरी ठेवण्यात येणार आहे.त्यामुळे संपूर्ण महिला मंडळच रॅलीत रंगणार आहे.
टीएसडी रॅलीची माहिती, नियमावली, वेग,वेळ आणि अंतर यांचे गणित नेमके कसे मांडतात ते कसे सोडवायचे कॅल्क्युलेशन कसे करतात, गुणपद्धती काय असेल, पेनलटी कुठे लागेल तसेच सराव रॅली, याबद्दलचे प्रशिक्षण मार्गदर्शन देण्यात येईल. तरी महाराष्ट्रभरातून जास्तीत जास्त स्त्रियांनी या रॅलीत सहभाग नोंदवावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क करा…!
9822662514, 9890402663, 9423963327