रॅली ऑफ नाशिक 2016 प्रोलोग

 वेस्टर्न  इंडिया स्पोर्ट्स अससोसिएशन आज प्रथमच नाशिकला प्रोलोग PROLOGUE  ही  ड्राइविंग कौशल्य स्पर्धा आयोजित केली आहे  . ही स्पर्धा  रॅली ऑफ नाशिक शि संलग्न आहे २६ नोव्हेंबर सकाळी ९.३०  वाजता  निवेक NIWEC इथे  होणार आहे , तरी आज नाशिकरानी स्पर्धकांना  प्रोत्साहन  देण्यासाठी मोठया  संख्येने या.  विसा  च्या  माध्यमातून आज ड्रायव्हर्स / रायडर्स  ना आपले वाहन चालवण्यातील कौशल्य दाखविता येणार आहे. आज शनिवार असल्यामुळे MIDC एरिया त , जरी कारखाने बंद असले तरी रॅली ऑफ नाशिक च्या स्पर्धकांची चांगलीच वर्दळ निवेक मध्ये असेल .

सगळेच स्पर्धक प्रोलोग ला नवे आहेत  . ती नक्की काय स्पर्धा आहे आणि  त्याच्या पेनल्टीएस कश्या मोजल्या जाणार या बद्दल स्पर्धकांना मध्ये कमालीची उत्सुकता आहे . त्यांना स्पर्धेच्या आधी हि माहिती दिली जाईल व लागेचच स्पर्धा सुरु होईल .
९.३० वाजता सकाळी प्रोलोग  व वाहनांची स्क्रुटिनी  हे दुपारी ३ वाजे प्रयत सुरु असेल.
यात स्प्रर्धकांना झिक  झॅक  पद्धतीत पुढे व मागे (रिव्हर्स) मध्ये गाडी चालवावि लागेल व छोटया आखलेल्या भागात यु टर्न  मारणे अश्या स्वरूपाची एकंदरीत चालकाचे कौशल्या बघणारी हि स्पर्धा आहे. दुसऱ्या दिवशी २७ नोव्हेंबरला स्पर्धे ला सुरुवात करताना प्रोलोग च्या पेनल्टी निशी  स्पर्धक सुरुवात करतील . त्यामुळेच मजे बरोबर त्याला स्पर्धेत हि महत्व आहे.
दुपारी  ३ वाजता ड्रायव्हर्स ब्रिफिंग  आहे . ड्रायव्हर्स व नेव्हिगेटर  दोघांना स्पर्धेतील बारकावे सांगितले जातील . त्यांना सांगितलेले सर्व नियमांचे पालन करत स्पर्धा  पूर्ण करायची आहे . ब्रिफींग नंतर स्पर्धक रॅली ऑफ नाशिक च्या स्पर्धेची तयारी करू शकतील .
विसा च्या रॅली  ला नाशिकरांचा भरभरून प्रतिसाद मिळतो पण यावर्षी एक तर पुण्यातील मोटोक्रॉस  स्पर्धा त्याच दिवशी असल्याने काही दुचाकी स्पर्धक  त्यांचा सहभाग सुनिश्चित करू शकले नाहीत व  काही अंशी नोट  बंदी मुळेही  चार चाकी वाहनाच्या एन्ट्रीज  कमी झाल्या.  बाजारातील नवीन चलन तुटवडा मात्र हौसेला मोल नसते या म्हणीवर भारी पडला व काही स्पर्धकांना स्पर्धेत भाग  घेता आला नाही .
२७ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता निवेक  हुन  रॅली ला सुरुवात होईल.