`रॅली ऑफ महाराष्ट्र`ची आज सुपरस्पेशल स्टेज
नामांकित स्पर्धेक कारसह दाखलः दस्तऐवज तपासणी,अत्यावश्यक बाबींवर चर्चा
नाशिक- ब्लु बॅंड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ च्या रॅली ऑफ महाराष्ट्रसाठी नाशिककर सज्ज झाले असून आता प्रतिक्षा पूर्ण झाली आहे, या रॅलीची सुरवात उद्या(ता.३१) खास प्रेक्षकांसाठी ग्रेप कौटी हॉटेलच्या परिसरात होणाऱ्या सुपर स्पेशल स्टेजने(एसएसएस) सुरवात होईल. रॅलीत यंदा तब्बल ५३ प्रवेशिका नोंदविण्यात आल्या आहे. त्यात ५ महिला संघाचाही सहभाग आहे.
दुपारी तीनला सर्व नामांकित चालक आपल्या सहचालकांशी पत्रकारांशी संवाद साधतील, त्यानंतर दुपारी ४वा ५६ मिनिटांनी या सुपर स्पेशल स्टेजला सुरवात होईल. हॉस्पिटीली पार्टनर ग्रेप सिटी हॉटेलचे संचालक तेजस् चव्हाण, सर्व्हिस पार्कचे पार्टनर सपकाळ नॉलेज हबचे सर्वेसर्वा रविंद्र सपकाळ, रेडीओ पार्टनर माय एफएमचे स्टेशन हेड शांकी पहाडे आदींच्या हस्ते कारला झेडा दाखविण्यात येईल. रॅलीचा हा थरार खूपच प्रेक्षणीय असतो आणि नाशिककर ही फेरी पाहण्यासाठी नेहमीच गर्दी करत असतात. यावेळेस महिरवणी, अंजनेरी,त्र्यंबकेश्वर, पहिने ह्या भागातील रहिवाश्यांना पण ही स्पर्धा जवळून पाहण्याचा आनंद मिळणार आहे॰ आज दिवसभर सर्व स्पर्धेकांची कागदपत्रे तपासणीबरोबरच त्यांच्या गाड्यांना नंबर देण्यात आले. त्याचप्रमाणे रँलीसंदर्भातील महत्वाच्या सूचना त्यांना देण्यात आल्या. उद्या सकाळी नऊला औद्योगिक परिसरातील मोहरीर अँटो येथे वाहनांची तपासणी केली जाणार आहे.
नामांकिताच्या सहभागामुळे चुरस
तब्बल आठ वर्षानी नाशिकमध्ये होत असलेल्या या रॅलीविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. रॅलीत ५३ स्पर्धेक असलेतरी मुख्य लढत ही गतविजेता अर्जुन राव आरूर- सतीश, करना कदूर- मुसा शेरीफ जोडीत दिसून येईल. ५ महिला संघाचाही सहभाग आहे. त्यामुळे वुमन्स पॉवर नेशन पॉवर रॅलीच्या निमित्ताने त्यांचे कसबही दिसेल. या रॅलीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशन (विसा) हे मुख्य आयोजक असून त्यांना ग्रेप कौंटी(हॉस्पिलिटी पार्टनर), सपकाळ नॉलेज हब (सर्व्हिस पार्क पार्टनर) आणि माय एफ(रेडिओ पार्टनर) या सहप्रायोजकांची समर्थ साथ लाभली आहे.