IRC 2014 Press Release – in Marathi

नाशिक ३ जून : वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन, भारतातील सर्वोत्कृष्ट आयोजक , लवकरच नाशिकमधल्या मोटर स्पोर्ट्स प्रेमींसाठी मोठा नजराणा घेऊन येत आहे . Mahindra Adventure Rally of Maharashtra , FMSCI च्या आय. आर. सी . अर्थात Indian Rally Championship चा पहिला राउंड १२ ते १५ जूनदरम्यान नाशिक शहर आणि परिसरात संपन्न होणार आहे . भंडारदऱ्याच्या अवघड घाटामध्ये ही rally होणार आहे . महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर , कळसूबाई , स्पर्धेच्या तिन्ही स्टेजेस मधून सतत दृष्टीला पडत राहते . पावसाळ्यात हे घाट अजूनच आव्हानात्मक ठरणार आहेत . त्यातून संपूर्ण IRC मधली हि एकमेव डांबरी रस्त्यावर होणारी फेरी असल्यामुळे हे आव्हान जास्त वाढणार आहे . म्हणूनच तज्ञांच्या मते गौरव गिल , अमितरजित घोष , सनी सिद्धू , समीर थापर यांच्यामधली रस्सीखेच पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल .
नाशिककर शहरी प्रेक्षकांसाठी शुक्रवारी १३ जून रोजी फाळके स्मारक परिसरात विशेष फेरीचे आयोजन केले आहे . दु . ३ वाजल्यापासून पुढे ह्या परिसरात वेगाचे साम्राज्य असेल . साधारण २ . ५ किमी अंतराची हि स्पर्धेतील पहिली स्पेशल स्टेज असणार आहे . शनिवार आणि रविवार हे मोटर स्पोर्ट्स प्रेमींसाठी मोठेच आकर्षण असणार आहे . भंडारदऱ्याजवळ स्टेजेस मध्ये आत जाण्यासाठी नाशिकहून पहाटे ५ पर्यंत निघावे लागेल , तरच इतर वाहनांसाठी rally रूट बंद होण्यापूर्वी गाड्या घेऊन आतपर्यंत जाता येईल . तीनही स्टेजेस मध्ये ठराविक ठिकाणी कॉन्सनट्रेटेड स्पॉटस तयार केले आहेत . बीटा मध्ये दोन आणि अल्फा , गामा मध्ये प्रत्येकी एक असे स्पॉटस प्रेक्षक आणि माध्यम प्रतिनिधींसाठी केलेले आहेत . इथे खाण्या – पिण्याची व्यवस्था करण्याचाही प्रयत्न आहे . या ठिकाणावरून उत्तम फोटोग्राफी करू शकता . हे सगळे स्पॉट म्हैसवळण घाटातून गेल्यास पोचायला सोपे आहेत . घाट चढून गेल्यावर रस्त्यावर पेंट करून प्रत्येक स्टेज कडे जाण्याचा मार्ग दाखवला आहे . या भागात नक्कीच Rally एन्जॉय करता येईल .
FMSCI ने रेग्युलेशन मध्ये बदल केल्यामुळे २०१४ मध्ये परदेशी स्पर्धकांना IRC मध्ये भाग घेऊन विजेतेपदासाठीचे गुण जिंकणे शक्य झाले आहे . म्हणूनच इतकी वर्षे INRC नावाने ओळखली जाणारी राष्ट्रीय स्पर्धा आता INDIAN RALLY CHAMPIONSHIP , IRC , अशी ओळखली जाईल . FIA च्या एशिया झोन मध्ये असलेल्या कोणत्याही देशातील खेळाडू हे गुण मिळवू शकतो . २०१४चा राष्ट्रीय विजेता एखादा परदेशी खेळाडू होऊ शकेल .
दरवर्षीची मोठी नावे जसे Mahindra Adventure , हॉटेल गेटवे , रेड एफ एम ९३.५ , आणि ओव्हरड्राईव हे सगळे यावर्षीही विसा बरोबर आहेतच . याशिवाय नाशिक सिटी सेंटर , नाशिककरांचा आवडता मॉलही टीम मध्ये सामील झाला आहे . त्याचप्रमाणे सुला वाईन , ज्यांनी नाशिकला वाईनचे शहर अशी नवी ओळख मिळवून दिली , तेही Mahindra Adventure Rally of Maharashtra शी यावर्षी जोडले आहेत .
नाशिकच्या Rally मध्ये नेहमीच नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या जातात . २०१४ सालही ह्याला अपवाद नाही . भारतीय मोटर स्पोर्ट्स च्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय विजेतेपद स्पर्धेवर फिल्म बनवली जात आहे . पॉवरड्रीफ्ट , Mahindra Adventure Rally of Maharashtra चे सहप्रायोजक आहेत . पॉवरड्रीफ्ट टीम भारतीय मोटर स्पोर्ट्स साठी आशादायक आहे . भारतीय मोटर स्पोर्ट्सला एक नवी दिशा देण्याचे काम त्या टीमकडून होऊ शकते . ऑटोमोबाईल्स वर इतक्या सुंदर फिल्म्स त्यांनी बनवल्या आहेत . मुख्य प्रवाहातील कमर्शियल फिल्म्स इतक्याच तांत्रिक दृष्ट्या सरस आहेत . हि बाब नक्कीच भारतीय क्रीडाक्षेत्रासाठी हे पुढचे पाऊल आहे . तंत्रज्ञानाकडे आकर्षण असलेल्या नवीन पिढीला फारच आवडेल अशीच ही गोष्ट आहे .
ऑफ रोड ड्राईविंग आवडणाऱ्या लोकांसाठी Mahindra Adventure हे एक Challenge आहे . गेल्या दोन वर्षात ५० पेक्षा जास्त ऑफ रोड ड्राईविंग स्पर्धा त्यांनी भरवल्या आहेत . ऑफ रोड ड्राईविंग Championship ही भारतात पहिल्यांदाच सुरु केली . २०१३ मध्ये Mahindra Adventure ने INRC मध्ये मोठ्या दिमाखात प्रवेश केला . त्याच वर्षात ते विसा बरोबरही जोडले गेले . त्यांच्या स्टार स्पर्धक गौरव गिलने इतर सगळ्या खेळाडूना वेळेच्या प्रचंड फरकाने मागे टाकत प्रत्येक स्पर्धेवर ठसा उमटवला . मात्र FMSCI च्या रेग्युलेशन मुळे तो २०१३चा राष्ट्रीय विजेता बनू शकला नाही . मात्र डीझेल XUV योग्य हातात पडल्यास काय करामत करू शकते हे खात्रीने सिद्ध करून दाखवले . हॉटेल गेटवे , भारतातील अग्रगण्य पंचतारांकित ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा भाग आहे . विश्वास आणि प्रामाणिकपणा हे त्यांचे समानार्थी शब्द आहेत याबद्दल कुणाचेही दुमत असणार नाही . गेले १४ वर्षे ते विसा बरोबर आहेत . यावर्षीही हॉटेल गेटवे Hospitality Partner आहेत . रेड एफ एम ९३ . ५ भारतातील आघाडीचा रेडीओ channel आहे . ते नाशिकमध्ये दाखल झाल्यापासून विसाशी त्यांचे नाते आहे . आजचा भारत तरुण आहे . नेहमी नवीन गाणी , नवीन म्युझिक ट्रेंड ऐकवत असल्यामुळे रेड एफ एमचे तरुणाईशी फारच जवळचे नाते आहे . ओव्हरड्राईव , देशातील लोकप्रिय ऑटोमोबाईल क्षेत्रातील मासिक , विसाचे Magazine पार्टनर म्हणून कायम सोबत असतात . Mahindra Adventure Rally of Maharashtra भरपूर कव्हर करतात . ओव्हरड्राईव आणि विसा ने पहिल्यांदाच Rally Guide प्रकाशित करण्याची कल्पना राबविली होती , ती परंपरा अजूनही फक्त विसाच्या IRC राउंड मध्ये चालू आहे . Rally Guide च्या ओव्हरड्राईव जवळ जवळ ५००० कॉपी छापतात . सर्व इंडस्ट्री मध्ये त्या पाठवल्या जातात . यावर्षी सर्वसाधारण लोकांपर्यंत पोचावे यासाठी सिटी सेंटर मॉल मधेही उपलब्ध असतील .
आजचे नाशिक एक आधुनिक शहर आहे . या आधुनिकपणाचे वैशिष्ट्य म्हणजे नाशिकमधला सर्वात मोठा मॉल , नाशिक सिटी सेंटर . Mahindra Adventure Rally of Maharashtra साठी नाशिक सिटी सेंटर मोठ्या प्रमाणात सपोर्ट करत आहे . स्पर्धेसाठी पूर्ण तयार गाडी नाशिक सिटी सेन्टरच्या मुख्य मंडपात ठेवली जाणार आहे . स्पर्धेपूर्वी केली जाणारी गाड्यांची तपासणी मॉलच्या पहिल्या मजल्यावरच्या पार्किंग मध्ये शुक्रवारी १३ जून रोजी होणार आहे . सर्विस पार्कही त्याच ठिकाणी शुक्रवार १३ जूनपासून ते रविवार १५जूनपर्यंत असणार आहे . गुरुवारी १२ जून दुपारी ४. ३० वाजता नाशिकमधील मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून नाशिक सिटी सेन्टरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळून स्पर्धेला सुरुवात होईल . ह्या कार्यक्रमादरम्यान आणि सर्विस पार्कमध्ये रसिकांना स्पर्धकांबरोबर फोटो काढण्याची तसेच त्यांची स्वाक्षरी साठी विशेष व्यवस्था केली जाईल . माध्यम प्रतिनिधीसाठी स्पर्धकांच्या मुलाखती घेण्यासाठी वेगळ्या backdrop सह व्यवस्था करण्यात येईल . सुला वाईन , नाशिकमधल्या वायनरी उद्योगाचे प्रणेते , २०१४ मध्ये होणाऱ्या विसाच्या सर्व स्पर्धांना पाठिंबा देत आहेत . Mahindra Adventure Rally of Maharashtra च्या पोडीयम फिनिश समारंभासाठी खास मोठ्या आकाराच्या बाटल्या सुलातर्फे बनवणार आहेत . हॉटेल गेटवे मध्ये १५ जूनच्या दुपारी हा समारंभ साजरा होईल .
विसाच्या सर्व प्रायोजकांचा पाठिंबा तसेच नाशिक महानगरपालिका, शहर, व ग्रामीण पोलिस आणि अहमदनगर ग्रामीण पोलिसांचे सहकार्य यामुळे Mahindra Adventure Rally of Maharashtra नक्कीच यशस्वी होणार असा विश्वास विसाच्या पदाधिकार्यांना आहे . नाशिकच्या मध्यम प्रतिनिधींचे सहकार्य तर त्यांचा स्वतः चा कार्यक्रम असल्यासारखे असतेच , तसेच यावर्षीही असेल . कोणाला स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी येण्याचे असल्यास विसा ऑफिस मध्ये संपर्क करावा . किंवा २३१६०६७, २३१६३९७ येथे फोन करावा . अद्ययावत माहितीसाठी www.wisa.org.in वर भेट द्यावी.