नाशिक १९ डिसेंबर : Koso Blind man’s Rally 2015 साठी नाशिककरांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे . जवळ जवळ ८५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे . दृष्टिहीन बांधव वेगवेगळ्या शहरातून आजच नाशिकमध्ये येउन दाखल झाले आहेत . नाशिक सिटी सेंटर मॉल मध्ये आज सर्व स्पर्धकांची ब्रीफिंग मीटिंग ठेवण्यात आली होती . उद्या सकाळी ८ वाजता सिटी सेंटर मधून स्पर्धेला झेंडा दाखवून सुरुवात होईल . स्पर्धेचे एकूण अंतर साधारण ६० किमी इतके असेल . या rally मधून मिळणारे सर्व उत्पन्न रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आशेवाडी गावातील शाळेची इमारत बांधण्यासाठी खर्च केले जाणार आहे .
सध्या सगळीकडे स्त्री शक्तीचा जागर चालू आहे . याही स्पर्धेत ८५ स्पर्धकांपैकी १५ जणी महिला आहेत . ह्यामुळेच सर्वोत्कृष्ट महिला संघासाठी खास पारितोषिक हि ठेवण्यात आले आहे . नाशिकमधील परविंदर सिंग सौंध , परितोष कोहोक अशी मोटर स्पोर्ट्स मधील दिग्गज नावेसुद्धा या एन्ट्री लिस्ट मध्ये आहेत . सर्व नेविगेटर्स rally साठी खूप उत्सुक दिसत होते . जिंकण्यासाठीच तयारी करून आले आहेत सगळे .
नेहमीप्रमाणे याही वेळी काही नाविन्य आणले आहे . हल्ली सेल्फी चे वेड वाढले आहे . त्यामुळे आयोजकांतर्फे सेल्फी कॉन्टेस्ट ठेवली आहे . सुरुवातीला ६० मिनिटामध्ये संपूर्ण टीम सोबत आणि गाडी बरोबर सेल्फी काढून पाठवायचा आहे . इतरही अनेक आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत . पहिल्या तीन क्रमांकाच्या संघाना ट्रॉफी मिळेल . त्याबरोबरच पहिल्या तीन सह्चालकाना रोख रकमेची बक्षिसेही मिळणार आहेत . वैष्णवी इलेकट्रीकल्स तर्फे प्रायोजित केलेली बक्षिसे पुढीलप्रमाणे – पहिले बक्षीस – रु . ५०००, दुसरे बक्षीस – रु . ३०००, तिसरे बक्षीस – रु . २०००. त्याचप्रमाणे सर्व नेविगेटर्सना सोनी गिफ्ट्स तर्फे गिफ्ट hamper मिळणार आहे . मुलगी वाचवा आणि पर्यावरण सुरक्षा ह्या दोन्ही मुद्द्यांसाठी वेगळी बक्षिसे ठेवली आहेत . या दोन्ही विषयावर आधारित गाडी सजवायची आहे .
BMR २०१५ हि स्पर्धा वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन आणि नाशिक राउंड टेबल १०७ यांच्या एकत्र प्रयत्नातून होत आहे . त्याकरता Blind Welfare Association चे सहकार्य लाभले आहे . या स्पर्धेसाठी अनेक प्रायोजक लाभले आहेत . कोसो हे प्रमुख प्रायोजक आहेत . वैष्णवी इलेकट्रीकल्स, Aress Software आणि JP Entreprise हे सह प्रायोजक आहेत . रेडीओ मिरची हे रेडीओ पार्टनर आहेत . नाशिक महानगरपालिका तसेच नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिस यांचेही उत्तम सहकार्य ह्या स्पर्धेला मिळाले आहे .