पत्रकार परिषद प्रेस नोट
नाशिकमध्ये ३१ मे पासून तीन दिवस “रॅली ऑफ महाराष्ट्र” मध्ये चारचाकीचा थरार
“ब्लु बॅंड स्पोर्ट्स आयएनआरसी २०२४” ची दुसरी फेरी घेण्याचा विसाला मानः नामांकितांचा सहभाग,नियोजन अंतिम टप्प्यात
नाशिक- फेडरेशन ऑफ मोटार स्पार्टस् इंडिया(एफएमएससीआय) मान्यतेने इंडियन नॅशनल रॅली चॅम्पियनशिप अर्थात आयएनआरसीची दुसरी फेरी नाशिकला होत आहे. वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् इंडिया(विसा)तर्फे ३१ मे ते २ जून या कालावधीत रॅली ऑफ महाराष्ट्र (ब्लू बॅन्ड एफएमएससीआय फोर व्हिलर आयएनआरसी २०२४) नाशिक परिसरात होत असून आठ वर्षानंतर विसा या संस्थेला आयोजनाचा मान मिळाला आहे. रॅलीची जोरदार तयारी झाली असून ती अंतिम टप्प्यात आहे. रॅलीत एमआरएफटायर्सचे,जेकेटायर्सचे यासह नावाजलेले चालक-सहचालक सहभागी होणार आहे.
याबाबत संयोजक आणि सहप्रायोजकांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. प्रत्यक्ष रॅलीला सुरुवात होण्यापुर्वी नाशिकमध्ये २७ मे पासूनच स्पर्धेकांच्या गाड्या दाखल होणार आहे. त्यामुळे रॅलीची तशी धामधुम चार ते पाच दिवस अगोदर सुरु असेल. यानिमित्ताने नाशिकच्या रस्त्यावर चारचाकीचा आवाज घुमणार आहे. या रॅलीसाठी त्र्यंबकेश्वरमार्गावरील ग्रेप कौटी(हॉस्पिटीलिटी पार्टनर), सपकाळ नॉलेज हब(सर्व्हीस पार्क पार्टनर), माय एफ( रेडीओ पार्टनर) हे सहप्रायोजक म्हणून आपले योगदान देत आहे.
ग्रेप कौंटी हे रॅलीचे मुख्यालय ठेवण्यात आले असून सपकाळ नॉलेज हबच्या ठिकाणी सर्व गाड्यांचे सर्व्हिस पार्क असेल. ३० मे रोजी वाहनाची कागदपत्र तपासणी, सुपर स्पेशल स्टेज मार्गाची तपासणी यासारखे कामकाज चालणार आहे. ३१ मे रोजी मोहरीर अँटोच्या ठिकाणी सहभागी सर्व वाहनांची तपासणी करण्याचे नियोजन आहे तसेच स्पर्धकांनी मार्गाची पाहणी करणे,चालक-सहचालकांसाठी सूचना देणे, सायंकाळी सुपर स्पेशल स्टेज पासून स्पर्धेला प्रारंभ होईल॰
अवघड घाटरस्त्याच्या मार्गाची निवड
३१ तारखेस सकाळी सहापासून रॅलीचा मार्ग बघण्यासाठी सर्व स्पर्धक साध्या गाड्यांमधून जातील. त्यासाठी नाशिक बाहेरील त्र्यंबकेश्वर, मोरचुंडी, निळमाती, घोडीपाडा, पोशेरा, करोली, हिरवेपडा,मोखाडा, यासारख्या ग्रामीण भागातील अवघड वळणदार रस्त्याची निवड करण्यात आली आहे. या घाटरस्त्याच्या मार्गावर आपली वाहने गतीने चालवतांना चालकांची खरे कसब लागणार आहे. चार चरणात ठराविक अंतरासाठी चालक-सहचालकांना आपली गुणवत्ता सिध्द करावी लागेल. सर्व गाड्या रँलीतील विविध चरणात सहभागी होऊन पुन्हा सर्व्हिस पार्कला परततील. फेडरेशनने नाशिकला हा मान दिल्याने सध्या विसाचे पदाधिकारी या रॅली नियोजनात व्यस्त असून तयारी अंतिम टप्प्यात आहे.
या रॅली मुळे दुर्गम भागातील लोकांना खूप थरारक खेळ तो ही राष्ट्रीय पातळीवरचा बघाईला मिळणार असल्याने गावातील लोकांमध्ये खूप उसटुकता दिसून येते आणि वेगवेगळ्या गावातील लोकांचा, सरपंचांचा खूप मोठा आधार आयोजकांना मिळत आहे. आयोजकांनी ह्या सर्व गावकर्यांचे आभार मानले आहेत.
महिला स्पर्धकांचाही आकर्षण
आठ वर्षानंतर होत असलेल्या या रॅलीत नावाजलेल्या आजीमाजी विजेत्यांसह एमआरएफ,जेके टायर्सच्या जोडीला मुंबई,पुण्यातील स्पर्धेकही सहभागी होणार असल्याने आपल्याला खरी चुरस दिसून येईल रॅलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदा महिला स्पर्धेच्या जोड्याही सहभागी होत आहे. उत्कृष्ठ कामगिरी बजावण्याचे त्यांचे ध्येय असून हम भी कुछ कम नही हेच जणू त्यांना दाखवून द्यायचे आहे, त्यामुळे इतर सर्व गटाप्रमाणे या महिला स्पर्धेकांचे वेगळे आकर्षण असेल. विजेत्यांना भरघोस अशी बक्षिसे दिली जाणार आहे. रॅलीच्या उद्घाटन सोहळ्याची सुरवात वरिष्ठ पोलिस अधिकारी,प्रायोजक आदींच्या उपस्थितीत होणार आहे. सहभागी स्पर्धेकांची संख्या यंदा अंदाजे ५० च्या घरात नक्कीच जाईल, असा विश्वास विसा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना वाटतो. स्पर्धेकांची संख्या जास्त असल्याने त्यामुळे स्वभाविकच अटीतटीची चुरस नक्कीच पहायला मिळेल, यात शंका नाही.
शहर वासीयांना रॅली चा आनंद मिळवा म्हणून ३१ मे दुपारी ४:५६ मिनिटांनी ग्रेप काऊंटि रिसॉर्ट मधून सुपर स्पेशल स्टेज ने रॅली ऑफ महाराष्ट्र ची सुरवात होणार आहे. हा थरार खूपच प्रेक्षणीय असतो आणि नाशिककर याच्या करिता खूप गर्दी पण करतात. ह्या वेळेस महिरवणी, अंजेनेरी, त्रिंबकेश्वर, पहिने ह्या भागातील रहिवाश्यांना पण ही स्पर्धा जवळून पाहण्याचा आनंद मिळणार आहे॰
१ जून आणि २ जून रोजी स्पर्धेचा मार्ग आणि वेळा कळण्यासाठी wisa.org.in या संकेत स्थळावर सर्व माहिती मिळू शकते.
१ आणि २ जून रोजी
जव्हार रस्त्यावर अंबोली फाट्या जवळ बोंबिलटेकते तोरंगण गाव जोडणारा रस्त्यावर स्पर्धा बघायची असेल तर प्रेक्षकांनी सकाळी ६;३० आणि ११;०० वाजता तिथे पोचावे.
निळमाती ते ओसीवरा गावांना जोडणारा रस्त्यावर स्पर्धा बघायची असेल तर प्रेक्षकांनी सकाळी ७:१५ आणि ११:१५ वाजता पोचावे
आणि
पोशेरा ते मोरचुंडी रस्त्यावर स्पर्धा बघायची असेल तर प्रेक्षकांनी सकाळी ८:१५ आणि १२:०० वाजता.
काल स्पर्धेची स्टँडर्ड एन्ट्री दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. आता २४ मे पर्यन्त लेट एन्ट्री देता येईल.