५३ प्रवेशिका: गतविजेता अर्जुन राव आरूर- सतीश, करना कदूर- मुसा शेरीफ जोडीत चुरसनाशिकः ब्लु बॅंड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ च्या रॅली ऑफ महाराष्ट्रसाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. रॅलीत यंदा तब्बल ५३ प्रवेशिका नोंदविण्यात आल्या असून त्यात ५ महिला संघाचाही सहभाग आहे. त्यामुळे वुमन्स पॉवर नेशन पॉवर रॅलीच्या निमित्ताने त्यांचे कसबही दिसेल
या रॅलीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशन (विसा) हे मुख्य आयोजक असून त्यांना ग्रेप कौंटी(हॉस्पिलिटी पार्टनर),सपकाळ नॉलेज हब(सर्व्हिस पार्क पार्टनर) आणि माय एफ(रेडिओ पार्टनर) या सहप्रायोजकांची समर्थ साथ लाभली आहे. ग्रेप कौंटीसह शहरातील विविध हॉटेल्समध्ये स्पर्धेकांच्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे. स्पर्धेक नाशिकमध्ये दाखल होत आहे. मोहरीर मोटर्स , सातपुर येथे ठिकाणी सर्व गाड्यांची तपासणी, ग्रेप काऊंटि मध्ये कागदपत्र तपासणी केली जाणार आहे.
नामांकित चालकांचा सहभाग
तब्बल आठ वर्षानी नाशिकमध्ये होत असलेल्या या रॅलीविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. यंदा स्पर्धेकांची नोंदणी ही ५० पार झाली आहे. एमआरएफ,जेके टायर्सच्या चालकांच्या विजयांच्या दावेदारीला इतर स्पोर्टस् क्लब,संघाचे तगडे आव्हान असेल. नामांकितांमध्ये गतविजेता अर्जुन राव अरुर हा राजगोपाल सतिश या आपल्या सहचालकांसह, तर करणा कदूर हा मुसा शेरीफ च्या साथीने उतरत आहे. रॅली म्हटलं की गौरव गिल हे स्वभाविकच नाव पुढे यायचे,पण हे नाव आता मागे पडले असलेतरी गौरव गील सहचालक महाराष्ट्रीयन अनिरूध्द रांगणेकरच्या साथीने काय कामगिरी बजावतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय गत वर्ष आय.एन.आर.सी-२ चा विजेता हारकिशन वाडिया आणि आय.एन.आर.सी-३ चा विजेता जेहान गिल यांची डांबरी रस्त्यावर खूप अतीतटीची स्पर्धा होईल. साहिल खन्ना,अमरजित घोष,जेसन साल्डाना,केसी अदित्य, विक्रमराव अरुर यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा असतील
त्र्यंबकरस्त्यावर वातावरणनिर्मिती
संपूर्ण त्र्यंबकरस्त्यावर रॅलीचे फलक लावून जोरदार वातावरणनिर्मिती केलेली आहे. त्यामुळे ३१ तारखेला खास नाशिककरांसाठी ग्रेप कौंटी परिसरात होणाऱ्या विशेष रॅली(सुपर स्पेशल स्टेज)ला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. कॉलेजच्या युवक-युवतींबरोबरच आजूबाजूचे नागरीक,हौशी प्रेक्षक गर्दी करतील यात शंका नाही, अर्थात या सर्वच ठिकाणी शहरी,ग्रामीण भागातील पोलिसांचा बंदोबस्त असेल, १ आणि २ तारखेला नाशिक बाहेरील त्र्यंबकेश्वर, मोरचुंडी, निळमाती, घोडीपाडा, पोशेरा, करोली, हिरवेपडा, मोखाडा, यासारख्या ग्रामीण भागातील अवघड वळणदार रस्त्याची निवड करण्यात आली आहे. या घाटरस्त्याच्या मार्गावर आपली वाहने गतीने चालवतांना चालकांची खरे कसब लागणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणांसाठी गावातील सरपंच,नागरीक तसेच जिल्हा पोलिसांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभणार आहे.
महिला स्पर्धेकांच्या कामगिरीकडे लक्ष
गेल्या काही वर्षापासून या राष्ट्रीय रॅलीमध्ये महिलांचीही संख्या वाढत आहे, यंदाच्या रॅली ऑफ महाराष्ट्रमध्ये पाच महिला संघानी सहभाग नोंदवला आहे. त्यात नामांकित बंगळूरची हर्षिता गौडा- एम.श्रीवास्ता,प्रगती गौडा-सुजीथ,अनुश्रीया,गुलाटी-अकुता करन, नोनगृम-राहुल संचेती, निकिता टकले-परमार यांचा समावेश असून नाशिकच्या डोंगरभाग,घाट वळणदार रस्त्यावर त्या कशी कामगिरी नोंदवता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छायाचित्रकारांसाठी खास बक्षिस
आठ वर्षानंतर नाशिकमध्ये होत असलेल्या रॅली ऑफ महाराष्ट्र ही छायाचित्र, व्हिडीओशुटींग,आपल्या बातमी,लेख लेखनाच्या माध्यमातून टिपणे हे देखील एक कौशल्यच म्हणता येईल, नाशिककर हौशी छायाचित्रकारांना ही रॅली आणि त्यांचा आँखो देखा हाल टिपता यावा, यासाठी विसाने त्यांना रॅलीच्या मार्गावर नेण्याची विशेष व्यवस्था केलेली आहे. एवढेच नव्हे तीन-चार दिवस अशा छायाचित्रकारांच्या वर्तमानपत्रातून प्रसिध्द होणाऱ्या छायाचित्रांना प्रथम(१५०० रूपये),द्वितीय(१००० रूपये) आणि तृतीय(७५० रूपये) या क्रमाने बक्षिसही दिली जाणार आहे.